Pasha Patel :  भोगावंच लागणार… 365 पैकी 322 दिवस शेतकऱ्यांना संकटाचे येणार, भाजप नेत्याचा अजब सल्ल्यानं खळबळ

Pasha Patel : भोगावंच लागणार… 365 पैकी 322 दिवस शेतकऱ्यांना संकटाचे येणार, भाजप नेत्याचा अजब सल्ल्यानं खळबळ

| Updated on: Aug 23, 2025 | 4:07 PM

भाजप नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत केलेल्या विधानावर अनेक शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'नेमकं शेतकऱ्यांनी निसर्गाचं काय नुकसान केलं हे त्यांनी सांगावं. शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य कराल तर शेतकरी गप्प बसणार नाही.' , असा इशाराच विजय घाडगे यांनी दिलाय

महाराष्ट्राचे भाजप नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. आपण निसर्गाचे खूप मोठे नुकसान केले आहे आणि आता त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं पाशा पटेल म्हणाले. इतकंच नाहीतर शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय करून घ्यावी, असंही पाशा पटेल यांनी म्हणत शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय. अतिवृष्टी आणि सोयाबीनच्या भावासह शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या मुद्द्यावर बोलताना धाराशिवमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘आपण निसर्गाचं मोठ नुकसान केलंय. त्यामुळे आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतील. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्पुरतं उभं राहण्यासाठी सरकार मदत देऊ शकतं. संपूर्ण नुकसान काही सरकार देऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.’, असं पाशा पटेल यांनी म्हटलंय. दरम्यान, पाशा पटेल यांनी सरकारला योग्य हमी भाग द्यायला सांगावं, असा पलटवार ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी केलाय.

Published on: Aug 23, 2025 04:07 PM