Ravindra Chavan  : दादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप! रवींद्र चव्हाण म्हणाले, मी फडणवीसांना सांगायचो, थोडा विचार करा…

Ravindra Chavan : दादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप! रवींद्र चव्हाण म्हणाले, मी फडणवीसांना सांगायचो, थोडा विचार करा…

| Updated on: Jan 03, 2026 | 6:43 PM

भाजप नेते रविंद्र चव्हाणांनी अजित पवारांना महायुतीत घेतल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. फडणवीसांना यापूर्वीच सावध केल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केलेल्या टिप्पणीला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. चंद्रशेखर बावनकुळेंनीही अजित पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशाबद्दल थेट आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, अजित पवारांना महायुतीत घेताना थोडा विचार करा, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. आता अजित पवारांच्या काही वक्तव्यांवरून त्यांना पश्चाताप होत असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. चव्हाण यांनी अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि “मी सत्तेत आहे” या त्यांच्या वक्तव्यावर टीका केली.

गुन्हा सिद्ध होण्याआधी कोणी दोषी असतो का, या अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, “आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण होईल”, असे चव्हाण म्हणाले. “अजितदादा, आपल्या गिरेबानात झाक के देखीए” असे म्हणत त्यांनी पवारांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्ते रोज आपली व्यथा मांडतात, असेही चव्हाण यांनी नमूद केले. या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांनी असे बोलायला नको होते, असे म्हटले आहे.

Published on: Jan 03, 2026 06:43 PM