Special Report | यंदा आगामी सातारा लोकसभेत राजे विरुध्द राजे येणार आमने-सामने?

| Updated on: May 22, 2023 | 7:59 AM

VIDEO | यंदा आगामी लोकसभेत एकमेकांचे विरोधक असणारे दोन्ही राजे आमने-सामने येणार? बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

मुंबई : सातारा लोकसभेतमध्ये यंदा राजे विरूद्ध राजे अशी लढत होणार का? अशी चर्चा सुरू आहे. कारण यापूर्वी एकाच पक्षात असणारे पण एकमेकांचे विरोधक मानले जाणारे दोन्ही राजे येणाऱ्या लोकसभेत आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. येत्या लोकसभेत राजे विरुद्ध राजे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या उदयनराजे विरोधात राष्ट्रवादी फलटणच्या रामराजे यांना मैदानात उतरवण्याच्या चर्चा होऊ लागल्यात. तर विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे यापुढची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले जातंय. यानंतर जयंत पाटील यांचं विधान आणि रामराजे यांच्या प्रतिक्रियेनंतर रामराजे विरूद्ध उदयनराजे असा सामना रंगण्याची चर्चा जोरात आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले तर शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांच्यात लढत झाली. तेव्हा सव्वा लाख मतांनी भोसले विजयी झाली. त्यानंतर विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे भाजपमध्ये आलेत आणि पोटनिवडणूक लागली आणि भाजपकडून उदयनराजे यांना तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना तिकीट दिलं पण ते पराभूत झाले. दरम्यान, रामराजे निंबाळकर यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. बघा स्पेशल रिपोर्ट