Ashish Shelar : आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्…

Ashish Shelar : आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्…

| Updated on: Jul 09, 2025 | 6:36 PM

भाजप आमदार फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आशिष शेलार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ठाकरे बंधूंवर निशाणाही साधला. शेलार यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर, ‘‘दोन बंधू एकत्र येत आहेत, तर आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी त्यांची अवस्था झाली आहे,’’ असे म्हणत भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला.  चित्रपटाच्या नावांवरून आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना डिवचल्याचे पाहायला मिळाले. परिस्थितीच्या माऱ्याने एकत्र आले, आता कसा झेंडा घेऊ हाती? असा सवाल करत एक नंबर या सिनेमाचा खर्च सात कोटी झाला पण प्रेक्षकांनी तो नाकारला असं म्हणत चित्रपटावरून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

विधानपरिषदेतील सभागृहात आज आमदार परिणय फुके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, सध्या प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये कथेला नाट्यमय वळण देण्यासाठी राजकीय नेत्यांना खलनायक म्हणून रंगवले जात आहे. यावर आशिष शेलार यांनी भाष्य करत मराठी चित्रपट झेंडा याचा उल्लेख करत ठाकरे बंधूंना टोला लगवला.

Published on: Jul 09, 2025 06:36 PM