Narayan Rane : नियतीनं ठरवलेलं चुकत नाही, ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही… राऊतांबद्दल राणेंचं वादग्रस्त विधान

Narayan Rane : नियतीनं ठरवलेलं चुकत नाही, ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही… राऊतांबद्दल राणेंचं वादग्रस्त विधान

| Updated on: Nov 08, 2025 | 9:44 PM

माजी मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राणेंनी राऊतांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांचे अस्तित्व आणि अस्त्र संपत चालले असल्याचा दावा केला. तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनंतर आता माजी मंत्री नारायण राणे यांनीही खासदार संजय राऊत यांच्याबद्दल एक विधान केले आहे, जे सध्या वादात सापडले आहे. राणे यांनी बोलताना राऊत सध्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. “संजय राऊत अॅडमिट आहे. तो वाचला पाहिजे. देवाला प्रार्थना केली मी. जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.

तर यानंतर नारायण राणे यांनी राऊतांच्या राजकीय स्थितीवरही टिप्पणी केली. “आता सगळंच अस्तित्व संपलंय. आणि अस्त्र पण संपत चाललाय. संपू नये असं मला वाटतं,” असे विधान त्यांनी केले. राणेंनी राऊतांना शुभेच्छा देत त्यांची तब्येत चांगली होवो अशी सदिच्छा व्यक्त केली. त्याचवेळी, “पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही,” असेही ते म्हणाले. या विधानासोबतच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत असल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला.

Published on: Nov 08, 2025 09:44 PM