Breaking | मराठी शाळांसंदर्भात भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Oct 01, 2021 | 4:35 PM

भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मुंबईत जवळपास 30 वर्षे सत्ता गाजवली, पण मुंबईत मराठीची (Marathi) अवस्था बिकट झाली आहे.

Follow us on

भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मुंबईत जवळपास 30 वर्षे सत्ता गाजवली, पण मुंबईत मराठीची (Marathi) अवस्था बिकट झाली आहे. मराठी माणूस बाहेर फेकला, तशीच अवस्था मराठी शाळांची (Marathi School) आणि भाषेची झाली आहे असा आरोप साटम यांनी केला आहे.

2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या 413 होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020-2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 280 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114 इतकी राहिल्याचं साटम यांनी म्हटलं आहे.