Nishikant Dubey : महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या दुबेचा मुंबईत अलिशान फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क
महाराष्ट्राचं देशाच्या विकासात योगदान आहे, हे आम्ही मान्य करतो. मात्र माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतलं. मुंबई, महाराष्ट्रातून कर देतात त्यात आमचं सुद्धा योगदान, असल्याचे म्हणत महाराष्ट्राविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुबेंनी आता युटर्न घेतला आहे. यासोबतच एक नवी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा मुंबईत अलिशान फ्लॅट असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मुंबईतील खार पश्चिम भागात झुलेलाल अपार्टमेंटमध्ये निशिकांत दुबे यांचा फ्लॅट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २००९ साली भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबईतील खार पश्चिम भागात अलिशान फ्लॅट खरेदी केला ज्याची किंमत कोटीच्या घरात आहे. तर १ कोटी ६० लाखांचा हाच अलिशान फ्लॅट सध्या निशिकांत दुबे यांनी भाड्याने दिला आहे. २००९ साली राजकारणात येण्यापूर्वी निशिकांत दुबे हे मुंबईतील एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. दरम्यान, मुंबईमध्ये मराठी माणसाला घरं मिळाली पाहिजे, या मुद्द्यावरून विधान परिषदेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे गटातील नेते अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्यानंतर या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
