BJP On Sanjay Raut : धाराशिव दौऱ्यात मर्सिडीजमध्ये बसून राऊत काजू-बदाम खात होते! भाजपच्या दाव्यानं खळबळ

BJP On Sanjay Raut : धाराशिव दौऱ्यात मर्सिडीजमध्ये बसून राऊत काजू-बदाम खात होते! भाजपच्या दाव्यानं खळबळ

| Updated on: Sep 26, 2025 | 2:17 PM

महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धाराशिव दौऱ्यादरम्यान राऊत मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खात होते, असा दावा बन यांनी केला. शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज असताना राऊत यांनी असं केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बन यांच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत धाराशिव दौऱ्यादरम्यान एका मर्सिडीज कारमध्ये बसून काजू बदाम खात होते. नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असताना, त्यांना बांधावर भेटून त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. त्याऐवजी, राऊत आलिशान गाडीत बसून काजू बदाम खात होते. मुंबईत बसून शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या राऊत यांना शेतकऱ्यांशी बोलायला लाज वाटली का, असा सवाल बन यांनी विचारला आहे.

बन यांनी पुढे म्हटलं की, राऊत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची भीती वाटली असावी, त्यामुळे ते गाडीत लपून बसले होते. एका बाजूला शेतकरी उपाशी आहेत आणि दुसरीकडे राऊत तुपाशी खात आहेत, याबद्दल त्यांना लाज वाटायला पाहिजे, असंही बन म्हणाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published on: Sep 26, 2025 02:17 PM