Pune : भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पक्षाकडून अ‍ॅक्शन अन्…

Pune : भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पक्षाकडून अ‍ॅक्शन अन्…

| Updated on: Jun 25, 2025 | 4:46 PM

भाजपच्या प्रमोद कोंढरे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. तर आमच्या पक्षाचा आहे म्हणून प्रमोद कोंढरे याला पाठीशी घालणार नाही. आज सकाळीच मी पुणे शहराध्यक्ष यांच्यासोबत बोलले आहे. त्याला पदमुक्त केलं आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचं गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्या प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या प्रमोद कोंढरे यांच्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंग केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यावेळी हा सर्व प्रकार घडला. सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन गडकरी पुण्यात येणार होते. भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यावेळी भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेत बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलीस निरिक्षकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Published on: Jun 25, 2025 04:46 PM