Vijay Kenvadekar : निलेश राणे शूटिंग करत घरात शिरले, मी नसताना माझ्या बेडरूममध्ये…केनवडेकरांचा खळबळजनक आरोप
निलेश राणे यांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करून स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप विजय केनवडेकर यांनी केला आहे. घरात सापडलेले पैसे हे त्यांच्या कायदेशीर बांधकाम व्यवसायाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केनवडेकरांनी कुटुंब दहशतीखाली असल्याचे सांगत, हे राजकीय खच्चीकरण असल्याचा दावा केला.
निलेश राणे यांनी आपल्या घरावर कथित स्टिंग ऑपरेशन केल्याबद्दल विजय केनवडेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी आपल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा आणि बेडरूममध्येही शिरल्याचा आरोप केनवडेकर यांनी केला. यावेळी घरी आपली पत्नी, वहिनी, वयोवृद्ध आई आणि पुतण्या उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. घरामध्ये आढळलेल्या पैशांवर स्पष्टीकरण देताना केनवडेकर म्हणाले की, ही रक्कम त्यांच्या केके बिल्डर या बांधकाम व्यवसायाची आहे, तसेच विजय फुटवेअर, विजय शूज आणि विनंती एंटरप्रायझेस या त्यांच्या इतर आस्थापनाही आहेत. त्यांनी हे पैसे कायदेशीर मार्गाने कमावलेले असून ते सिद्ध करण्याची आपली तयारी असल्याचे नमूद केले. हे सर्व राजकीय हेतूने आपल्याला लक्ष्य करण्यासाठी केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
Published on: Nov 27, 2025 05:50 PM
