‘… औकात दाखवली’, मोदींचा दिल्लीतील विजयानंतर विरोधकांवर हल्लाबोल, ‘इंडिया आघाडी’ चं पुढं काय होणार?
हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्ली. सलग तीन राज्यात विरोधकांना जबर धक्के बसलेत. त्यामुळे इंडिया आघाडीचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झालाय. उद्धव ठाकरेंनी तर एकत्र काम करण्यावरून विचार करावा लागेल असं म्हटल्याचं संजय राऊत म्हणालेत.
महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीतही भाजपने विजय मिळवला आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं. केजरीवालांसह आपचा दिल्लीत पराभव झाला. त्याचं खापर इंडिया आघाडीतीलच घटक पक्षांनी आतपासातल्या फुटीवर फोडलंय. निवडणुकीत भाजप, आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. इंडिया आघाडीत असूनही आप आणि काँग्रेसने आघाडी केली नाही. एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले. मतविभाजनामुळे ज्याचा थेट फायदा भाजपला झाला. आधी हरियाणा आणि नंतर महाराष्ट्र आणि आता दिल्ली विधानसभेत भाजपने विजय मिळवलाय. राज्यांच्या विधानसभामध्ये भाजप जिंकत चालली आणि विरोधी हरतायत. त्यामुळे पुढे इंडिया आघाडीचं काय होणार? हा प्रश्न आहे. हरियाणात काँग्रेस आणि आपची आघाडी झाली नाही तिथे भाजपचा विजय झाला. दिल्लीतही काँग्रेस आणि आप एकत्र लढले नाहीत. त्याचा परिणाम पुन्हा भाजपचाच विजय झाला. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढत नसतील तर इंडिया आघाडी कशी टिकेल हा प्रश्न आहे. दिल्लीतील आप आणि काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीत दोघांचीही बार्गेनिंग पॉवर कमी झाली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. इंडिया आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसचा राज्याच्या निवडणुकीतला परफॉर्मन्स खूप खराब होतोय. आता इंडिया आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचंच अधिक वजन असणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
