Maharashtra Election Results 2026 : ‘बन’ गया नगरसेवक.. पत्रकार ते प्रवक्ता.. पहिल्याच झटक्यात नवनाथ बन महापालिकेत
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 135 मधून भाजपचे नवनाथ बन तर प्रभाग 33 मधून काँग्रेसचे मोईन सिद्दिकी विजयी झाले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी प्रभाग 21 मधून विजय मिळवत मनसेचे पहिले खाते उघडले. मुंबईत मनसेचे सात उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग 135 मधून भाजपचे प्रवक्ते आणि पत्रकार नवनाथ बन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नवनाथ बन यांच्या विजयाने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांनी आपला विजय गुलाल उधळून साजरा केला. याचबरोबर, प्रभाग 33 मधून काँग्रेसचे मोईन सिद्दिकी विजयी झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेसाठी आनंदाची बातमी आहे. प्रभाग 21 मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी विजय संपादन करत पक्षाचे खाते उघडले आहे. मुंबईमध्ये मनसेचे सात उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. प्रभाग 104 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे देखील आघाडीवर आहेत.
Published on: Jan 16, 2026 12:12 PM
