Suresh Kakani | लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लॅन तयार, सुरेश काकाणींची माहिती

Suresh Kakani | लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लॅन तयार, सुरेश काकाणींची माहिती

| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 6:43 PM

लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्लान तयार केला आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्लान तयार केला आहे. केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल, असं ते म्हणाले.

सुरेश काकाणी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार आहे. मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येताच 2-3 दिवसांत लहान मुलांचे लसrकरण सुरु करण्यात येईल. प्रसूतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालये, महापालिकेची 350 लसीकरण केंद्रे या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल, असं काकाणी यांनी सांगितलं.