Avinash Bhosale यांच्या मालमत्तेचा ताबा घेऊ नये; Mumbai हायकोर्टाचे ईडीला आदेश

| Updated on: Jun 09, 2022 | 7:42 PM

अविनाश भोसले यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर भोसलेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्यावर सध्या सीबीआय आणि ईडीतर्फे कारवाई सुरू आहे.

Follow us on

पुणे : येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची मालमत्ता जप्त करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ग्रुप ऑफ कंपनीचे (ABIL)प्रवर्तक, पुण्यातील उद्योजक आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) ने त्यांच्यावर कारवाई करत अटक केली होती. तर त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार होती. अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी)ला न्यायालयाने भोसलेंची मालमत्ता ताब्यात न घेण्याचे निर्देश दिले आहेत. अविनाश भोसले यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर भोसलेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्यावर सध्या सीबीआय आणि ईडीतर्फे कारवाई सुरू आहे.