Buldhana Hair Loss Video : बुलढाण्यातील टकल्या लोकांच्या डोक्यावर केस पुन्हा आले पण आता ‘या’ नव्या आजारानं ग्रासलं
. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती. या लोकांना फंगल इन्फेक्शन झाले नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. तर यासमस्येदरम्यान आयसीएमआरच्या पथकाने गावात येऊन तपासणीही केली होती
गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या अनेक गावांत टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आधी डोक्याला खाज सुटणं, नंतर केस गळून सरळ हातात येणं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणं, यामुळेच नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरले होते. या घटनेची चर्चा देशभर सुरु झाल्याचे पाहायला मिळाले होते. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती. या लोकांना फंगल इन्फेक्शन झाले नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. तर यासमस्येदरम्यान आयसीएमआरच्या पथकाने गावात येऊन तपासणीही केली होती. मात्र ठोस काही कारण समोर आलं नाही. दरम्यान, यासंदर्भात आता नवी अपडेट समोर आली आहे. बुलढाणा येथील शेगांव गावातील अनेक लोकांच्या डोक्यावर आता एका औषधाने केस उगवले आहेत. परंतू आता त्यांना नवीन समस्या सुरु झाली आहे. ज्या लोकांना टक्कल पडले होते. जे केस गळतीच्या समस्येने हैराण झाले होते. त्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे. तर काहींची नजर कमजोर होत असल्याचे या गावातील लोकांकडून सांगितले जात आहे. तर केस गळतीनंतर आता या समस्येवर तात्काळ निदान शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
