Buldhana : सोयाबीन पिक पाण्याखाली, शेतकऱ्यावर आली तिबार पेरणीची वेळ
बुलढाणा तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे.
गणेश सोळंकी, प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. शेतातील पिकं पाण्याखाली गेलेली असल्याने आता शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील पाच मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी या भागांतील शेतकऱ्यांननि दुबार पेरणी केली होती, यावेळी सुद्धा तिबार पेरणी करण्याची वेळ आली .. सध्या शेतात गुडघाभर पाणी साचलेले असून संपूर्ण सोयाबीन पिक पाण्याखाली आलेय. तब्बल १२ तासांचा वर कालावधी उलटला तरीही पाणी साचलेले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शेतकऱ्या सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी यांनी..
Published on: Jul 23, 2025 04:23 PM
