असं कधीच घडलं नव्हतं… आकाशातून आले जळते दगड… भंडाऱ्यात एकच खळबळ
सध्या भंडाऱ्यातील जनता प्रचंड भीती खाली आहे. भंडाऱ्यात आकाशातून जळते दगड आले. त्यामुळे नागरिकांना हे दगड पाहून घाम फुटला आहे. दोन जळत्या दगडाचे तुकडे पडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. अचानक कसं घडलं?
सध्या भंडाऱ्यातील जनता प्रचंड भीती खाली आहे. भंडाऱ्यात आकाशातून जळते दगड आले. त्यामुळे नागरिकांना हे दगड पाहून घाम फुटला आहे. दोन जळत्या दगडाचे तुकडे पडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. अचानक कसं घडलं? आकाशातून जळते दगडं कसे येऊ शकतात? हे कसं शक्य आहे? असे नानाविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. ही घटना भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरातील जवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्ट्री परिसरातील आहे. परसोडी गावातील सुगत बुद्ध विहाराच्या मोकळ्या ले आऊटमध्ये हे दगड पडले. या घटनेची माहिती मिळताच वैज्ञानिकांचं पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी धावून गेले.
Published on: Jan 13, 2026 02:13 PM
