Indias New Vice President : सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मतं फुटली अन्…
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन 452 मतांनी भारताचे नवीन उपराष्ट्रपती निवडून आले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 300 मते मिळाली. 768 खासदारांनी या निवडणुकीत मतदान केले.
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांना 452 पहिल्या पसंतीची मते मिळाली. एकूण 768 खासदारांनी मतदान केले होते. विरोधी पक्षाच्या उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना सुमारे 300 मते मिळाली. या निवडणुकीत एनडीएला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली, तर इंडिया आघाडीला काही मतांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयानंतर त्यांचे समर्थक उत्साहात सामील झाले आहेत. दरम्यान, या निवडणुकीचा महाराष्ट्रातील राजकारणावर काहीही परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
Published on: Sep 10, 2025 11:06 AM
