Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने रणजी स्पर्धेआधीच सोडलं मुंबईचं कर्णधारपद, अचानक का घेतला मोठा निर्णय?

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने रणजी स्पर्धेआधीच सोडलं मुंबईचं कर्णधारपद, अचानक का घेतला मोठा निर्णय?

| Updated on: Aug 22, 2025 | 2:39 PM

अजिंक्य रहाणेने त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने अचानक मुंबईच्या रणजी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. कारण नेमकं काय?

अजिंक्य रहाणेने रणजी स्पर्धेआधी मुंबईचं कर्णधारपद सोडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तर आता नव्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्याची ही योग्य वेळ असल्याचेही भावूक वक्तव्य अजिंक्य रहाणेकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेने रणजी स्पर्धेआधी मुंबईचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी मात्र तो फलंदाज म्हणून संघात कायम राहणार आहे. भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आगामी रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. हा निर्णय घेताना तो म्हणाला, नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे.

दरम्यान, अजिंक्य रहाणेने आतापर्यंत क्रिकेटमध्ये २०१ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने १४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटले की, ‘मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि विजेतेपद जिंकणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. नवीन देशांतर्गत सामन्यापूर्वी, मला वाटते की आता नवीन कर्णधार तयार करण्याची योग्य वेळ आली आहे. म्हणूनच मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी एक खेळाडू म्हणून पूर्णपणे समर्पित राहीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत अधिक जेतेपदे जिंकण्याचा प्रयत्न करेन.’

Published on: Aug 22, 2025 02:39 PM