Breaking | अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी

Breaking | अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी

| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 5:46 PM

अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या 100 कोटी वसूली प्रकरणात सीबीआयने एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. पुणे येथील कोथरुडमध्ये एसीपी संजय पाटीलच्या घरी सीबीआयची रेड काल उशिरा पर्यंत चालली. एसीपी

अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या 100 कोटी वसूली प्रकरणात सीबीआयने एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. पुणे येथील कोथरुडमध्ये एसीपी संजय पाटीलच्या घरी सीबीआयची रेड काल उशिरा पर्यंत चालली. एसीपी संजय पाटील मुंबई पोलीस सोशल सर्विसमध्ये असताना वाझे प्रकरण 100 कोटी वसूली केसमध्ये त्यांचे नाव समोर आलं होतं. एसीपी पाटील यांचं स्टेटमेंट पूर्वी सीबीआयने घेतला होतं. एसीपी संजय पाटील यांची ट्रांसफर LA विभागात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलातील उपायुक्त राजू भुजबळ यांचे नावही समोर आले होते. राजू भुजबळ हे मुळ संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे रहिवाशी आहेत. काल दुपारी सीबीआय पथकाने अचानक त्यांच्या घरी चौकशी केल्याची माहिती आहे. यांच्या व्यतिरिक्त काही मध्यस्थांच्या ठिकाणी छापेमारी केली आहे. ठाणे ,पुणे , आणि इतर। अनेक शहरात एकूण 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीची कारवाई संपली असून पुढील तपास सीबीआय करत आहे.