शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?

शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?

| Updated on: Aug 19, 2026 | 1:36 PM

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन डझन मंत्र्यांमध्ये बदल अपेक्षित आहे. या विस्तारात एकनाथ शिंदेंना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवे असल्याची चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन डझन मंत्र्यांमध्ये बदल अपेक्षित आहे. या विस्तारात एकनाथ शिंदेंना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवे असल्याची चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे तसेच फुटीर सहा खासदारांपैकी एकालाही मंत्रीपद मिळेल अशा चर्चा होत्या. कालांतराने या चर्चांना पुर्णविराम लागला मात्र आता पुन्हा सर्व चर्चंना उधाण आले आहे.  धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर काही मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती कमी केली जाऊ शकतात. द्रमुकलाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबतच अपात्रता प्रकरणावर आजही सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आज आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. काल कपिल सिब्बल यांनी तासाभरापेक्षा अधिक काळ युक्तिवाद केला होता. दुपारी दोन वाजता या सुनावणीला सुरुवात होणार असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या आणि तत्कालीन विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरही या सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Published on: Aug 19, 2026 1:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us