मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावरील वाहतूक विस्कळीत

| Updated on: Aug 04, 2023 | 11:15 AM

VIDEO | मुंबई लोकल ट्रेननं प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा... मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Follow us on

ठाणे, ४ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढल्याचे पाहायला मिळाले होते. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे वाहतुकीला देखील बसला. मात्र आज सकाळी पाऊस नसतानाही मुंबईतील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळच रेल्वे रुळाखाली मोठा खड्डा पडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा खड्डा बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तब्बल 15 ते 20 मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. भिवपुरी रोड स्टेशनवरील हेडमास्तर ऑफिसजवळ रेल्वे रुळाला मोठा खड्डा पडला. रुळाखाली हा मोठा खड्डा पडल्याचं सकाळी 7 वाजता लक्षात आलं. ही बाब लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर खड्डा बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं. मात्र याचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सकाळी सकाळी बसला. लोकल सेवा उशिराने धावत असल्याने भिवपुरीपासून ते बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीतूनच प्रवाशांना जावं लागत होतं. सकाळी सकाळीच हाल झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप झाला.