Chandrakant Patil | पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशीची आमची मागणी : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशीची आमची मागणी : चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 11:56 AM

पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

विधिमंडळाचं अधिवेशन कमी वेळात उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच त्यांनी ठरवलं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय होतो ते पाहून आम्ही निर्णय घेऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर फुटीवर आम्ही प्रचंड आक्रमक होणार आहोत. सगळी क्रोनॉलॉजी, घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. सीबीआय चौकशी नको म्हणताय तर कुठली तरी चौकशी लावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.