MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 August 2021
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 'तुझ्या दंडात किती ताकद हे बघ' अशी कोल्हापुरी भाषेत टीका केली आहे.
भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
