Chhagan Bhujbal : मराठ्यांच्या खाडाखोड करून नोंदी, भुजबळांच्या गंभीर आरोपांनी खळबळ

Chhagan Bhujbal : मराठ्यांच्या खाडाखोड करून नोंदी, भुजबळांच्या गंभीर आरोपांनी खळबळ

| Updated on: Sep 17, 2025 | 11:25 AM

ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजातील बोगस कुणबी नोंदींचे पुरावे सादर केले. त्यांनी दाखवलेल्या पुराव्यांनंतर उपसमिती अध्यक्षांनी अशा बोगस नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्रे देण्यास बंदी घातली. भुजबळ यांनी खोट्या ओबीसी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र समितीचीही मागणी केली.

ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक वादाळी ठरली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा कुणबी समाजातील बोगस जात नोंदींचे पुरावे सादर केले. त्यांनी दाखवलेल्या पुराव्यानुसार, अनेक नोंदी हाताने लिहिलेल्या आणि बनावट असल्याचे दिसून आले. या पुराव्यांच्या आधारे, उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्रे देण्यास तात्काळ बंदी घातली. भुजबळ यांनी पुढे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि खोट्या ओबीसी जात प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी केली. त्यांनी न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या धर्तीवर ही समिती नेमण्याची सूचना केली.

Published on: Sep 17, 2025 11:25 AM