Chhagan Bhujbal | भुजबळांचा संताप आणि संकेत… विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?

Chhagan Bhujbal | भुजबळांचा संताप आणि संकेत… विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?

| Updated on: Feb 14, 2026 | 1:52 PM

रोज फक्त विलिनीकरण, विलिनीकरण अशीच चर्चा का चालू आहे? विलिनीकरण करायचं असेल तर आजही करता येईल, दोन महिन्यांनीही करता येईल. घाई करण्याचं कारण काय?”

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी सांगितले होते की, समोरून प्रस्ताव आला तर त्यावर निर्णय घेतला जाईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केला आहे. भुजबळ म्हणाले, “मला समजत नाही, रोज फक्त विलिनीकरण, विलिनीकरण अशीच चर्चा का चालू आहे? विलिनीकरण करायचं असेल तर आजही करता येईल, दोन महिन्यांनीही करता येईल. घाई करण्याचं कारण काय?” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार बसल्या आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही सुनेत्रा ताईंची निवड करू, अशी तयारी आहे. “दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक घेऊन चर्चा केल्यावरच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी घाई करण्याचे काही कारण नाही,” असे भुजबळ यांनी सांगितले.

Published on: Feb 14, 2026 01:52 PM