‘ताठ होती माना… उंच होतील नजरा’, शिवरायांच्या 12 गड-किल्ल्यांना ‘वर्ल्ड हेरिटेज’ नामांकन, ‘या’ किल्ल्यांचा समावेश?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.
केवळ महाराष्ट्रातीलच नाहीतर देशभरातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांना ‘वर्ल्ड हेरिटेज’ नामांकन देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. सरकारी शिष्टमंडळाची पॅरीसमध्ये वर्ल्ड हेरिटेड कमिटीशी चर्चा झाली. त्यामुळे युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची देखील भेट घेण्यात आली आहे. या भेटीनंतर महाराजांच्या तब्बल 12 गड-किल्ल्यांना ‘वर्ल्ड हेरिटेज’ नामांकन देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ सध्या पॅरिस दौऱ्यावर आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
