India Pak Tension : चीन-पाकिस्तान भाई-भाई… भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर

India Pak Tension : चीन-पाकिस्तान भाई-भाई… भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर

| Updated on: May 16, 2025 | 6:04 PM

भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान भारताविरोधाती चीनच्या कुरापती आता समोर आल्या आहेत. यासह भारत आणि पाकिस्तान तणावात चीन भूमिका असल्याचेही पुराव्यातून समोर आले आहे.

भारत आणि पाकिस्तान तणावात चीन भूमिका असल्याचे दहा पुरावे आता समोर आले आहेत. चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा भारताविरोधात वापर झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर चीन आणि पाकिस्तानचा अनेकदा भारताविरोधात संयुक्त लष्करी सराव झाल्याचेही आता पुढे आले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा चीनचे नापाक इरादे समोर आले आहेत. भारत आणि पाकिस्तान तणावात चीन भूमिका दर्शवणारे दहा पुरावे भारताच्या हाती लागले आहेत. तर भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान चीन पाकिस्तानला सगळी रसद पुरवत होतं, असं या पुराव्याच्या माध्यमातून समोर आले आहे. पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा भारताविरूद्ध वापर, पीओकेमध्ये चीनची लष्करी उपस्थिती, दहशतवादी संघटनांना अप्रत्यक्ष पाठिंबा, चीन आणि पाकिस्तानमध्ये धोरणात्मक युती, भारतविरोधी संयुक्त लष्करी सराव, गलवान संघर्षानंतर पाककडून गोळीबार आणि भारतीय सीमेजवळ चिनी ड्रोनच्या हालचाली… असे अनेक चीनचे पुरावे समोर आले आहेत.

Published on: May 16, 2025 06:04 PM