Chipi Airport | चिपी विमानतळाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमावर फडणवीस, दरेकरांचा बहिष्कार

| Updated on: Oct 08, 2021 | 9:26 PM

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. पण या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही अद्याप मिळालेलं नाही. प्रविण दरेकर यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती स्वत: प्रविण दरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.

Follow us on

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. पण या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही अद्याप मिळालेलं नाही. प्रविण दरेकर यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती स्वत: प्रविण दरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

विधान परिषेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या दोघांचीही नावे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे तर विमानतळाच्या बांधकामात योगदान असताना त्यांचेही नाव नाही. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असते. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.