Mahayuti rift : महायुतीत खरंच नाराजी आहे का? शिंदे-फडणवीस खरंच बोलले नाहीत; आता नेमकं सत्य आलं समोर!

Mahayuti rift : महायुतीत खरंच नाराजी आहे का? शिंदे-फडणवीस खरंच बोलले नाहीत; आता नेमकं सत्य आलं समोर!

| Updated on: Nov 23, 2025 | 9:35 PM

अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी मोकळ्या गप्पा मारताना दिसले. त्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना हा दिलखुलास गप्पांच्या प्रसंगानं सर्व चर्चा फोल ठरल्यात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या. कालच्या कार्यक्रमात आपल्यात बोलण्यासारखे काहीच घडले नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “अमृता फडणवीस यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि मी भेटलो, बोललो. पुरस्कारार्थींच्या खुर्च्यांमुळे आम्ही बाजूला बसलो होतो, पण आम्ही स्टेजवरही भेटलो आणि खाली उतरतानाही बोललो,” असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीनाट्य सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या मात्र अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाउंडेशन’ कार्यक्रमादरम्यान काल हे चित्र पूर्णपणे बदलले. फडणवीस आणि शिंदे यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे दिलखुलास चर्चा झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सर्व चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे.

Published on: Nov 23, 2025 09:35 PM