Devendra Fadnavis : बाप काढणं चुकीचं… मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली नितेश राणेंना समज
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांनी समज दिली असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. कोणीही कितीही ताकद दाखवली. कोणी कितीही इकडे-तिकडे नाचले तरी शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा’, असं वक्तव्य भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना समज दिल्याचे सांगितले जात आहे. ‘कोणाचीही बाप काढणं चुकीचं आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. अशा प्रकारे बोलणं योग्य नसल्याचे मी त्यांना सांगितले आहे आणि त्यांनी ते मान्य केलं असल्याचे म्हटले आहे.’
Published on: Jun 10, 2025 07:13 PM
