Maharashtra Municipal Elections : फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा मेगा प्लान ठरला!
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 10 दिवसांत सुमारे 40 ते 45 सभांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये दोनहून अधिक सभा होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी 10 दिवसांत जवळपास 40 ते 45 प्रचार सभा घेणार आहेत. प्रत्येक महापालिकेसाठी या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या महापालिकांमध्ये सुमारे तीन ते चार सभांचे आयोजन केले जाईल, तर छोट्या महापालिकांमध्ये प्रत्येकी एक सभा पार पडणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दोनहून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. आता महापालिका निवडणुकांमध्येही तेच चित्र दिसणार आहे. दिवसाला सुमारे 10 सभा घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रचाराला वेग येईल. हे नियोजन आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना ताकद देणारे ठरू शकते
