Farmers Aid Package : बळीराजाला आत्तापर्यंतची सर्वात मोठी मदत, शेतकऱ्यांना कशाप्रकारे अन् किती कोटींचं पॅकेज जाहीर?

Farmers Aid Package : बळीराजाला आत्तापर्यंतची सर्वात मोठी मदत, शेतकऱ्यांना कशाप्रकारे अन् किती कोटींचं पॅकेज जाहीर?

| Updated on: Oct 08, 2025 | 11:38 AM

महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पिकांच्या नुकसानीसोबतच घरं, विहिरी, जनावरे आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठीही मदत दिली जाईल. यात हेक्टरी १८,५०० ते ३२,५०० रुपयांपर्यंतची मदत समाविष्ट आहे. ओला दुष्काळ जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना फी माफी व कर्जाच्या वसुलीला स्थगिती मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पॅकेजमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीसोबतच घरं, विहिरी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही मदत समाविष्ट आहे. एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे ही मदत दिली जाणार असून, यात रब्बी हंगामासाठी बी-बियांसाठी हेक्टरी १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत समाविष्ट आहे.

कोरडवाहूसाठी हेक्टरी १८,५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७,००० रुपये आणि बागायतीसाठी ३२,५०० रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १७,००० रुपयांची वेगळी मदत दिली जाईल. ही मदत तीन हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी लागू असेल. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फी माफी, जमीन महसुलात सूट आणि कर्जाचे पुनर्गठन यांसारख्या सवलती मिळतील. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Published on: Oct 08, 2025 11:37 AM