Devendra Fadnavis : जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले; समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

Devendra Fadnavis : जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले; समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

| Updated on: Jun 05, 2025 | 4:32 PM

Samruddhi Mahamarg Inauguration : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली.

महायुती सरकारसाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही जे २०१४ नंतर सरकार आल्यावर जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले. हा महामार्ग नसून समृध्दी करणारा आहे. २४ जिल्हे जोडले आहे, जेएनपिटी सोबत जोडला आहे लवकरच वाढवण बंदगाराशी जोडला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थित पहिल्या टप्यात लोकार्पण झाले. आज शेवटच्या टप्प्यात राज्य सत्कारच महायुतीचे प्रतिनिधी करत आहोत. वेगवेगळया रचना यात केल्या आहेत. वन्य जीवाचे विचारणं होत आहे ३२ मुख्य पूल आहेत. ६० ओव्हर पास आहे, अंडर पास आहे. एकूण ७ बोगदे केले आहेत आता आपण आहोत ते रूंद आठ किलो मीटरचा आहे याचा रेकॉर्ड आपणच तोडू पण आता देशातला सगळ्यात मोठा बोगदा हा आहे. शेवटचा टप्पा ७६ किलो मीटरचा आहे. यांच्यात फायर सिस्टिम आहे तापमान ६० वर गेले की पाऊस चालू होतो आणि ३० वर आल्यावर बंद होते. ट्रॅफिक वाढत आहे आता दहापट झाली अजून वाढेल. अनेक नेत्यांनी जागेसाठी विरोध केला होता. पण मला आनंद आहे. आमच्या काळात सुरू झालेले काम आमच्या काळात महायुतीच्या काळात पूर्ण झाले.

Published on: Jun 05, 2025 04:32 PM