मालेगावमधील नर्सिंग महाविद्यालयात आढळली नागाची अंडी

मालेगावमधील नर्सिंग महाविद्यालयात आढळली नागाची अंडी

| Updated on: May 31, 2022 | 9:49 AM

मालेगावमधील एका नर्सिंग महाविद्यालयात नागाची अंडी आढळून आली आहेत. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अंड्यासह नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधील एका  नर्सिंग महाविद्यालयात नागाची अंडी आढळून आली आहेत. नर्सिंग महाविद्यायाच्या स्टोअररूमध्ये ही अंडी सापडली. थोडेथिडके नव्हे तर तब्बल 25 अंडी इथे आढळून आली आहेत. दरम्यान त्यानंतर लगेचच सर्पमित्रांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन नाग आणि त्याच्या अंड्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं. मात्र या प्रकाराने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.