Coldrif  Syrup Ban : कोल्ड्रीफ कफ सिरप कंपनीच्या मालकाला अटक, इतर दोन औषधांमध्येही विषारी घटक

Coldrif Syrup Ban : कोल्ड्रीफ कफ सिरप कंपनीच्या मालकाला अटक, इतर दोन औषधांमध्येही विषारी घटक

| Updated on: Oct 09, 2025 | 6:09 PM

कोल्ड्रीफ कफ सिरप बनवणाऱ्या श्रीसंत फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना मध्यप्रदेशमधील एसआयटीने चेन्नईतून अटक केली आहे. त्यांच्यावर 20 हजार रुपयांचे बक्षीस होते. कोल्ड्रीफसह रेस्पि फ्रेश टीआर आणि री लाईफ या दोन औषधांमध्येही विषारी घटक आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

कोल्ड्रीफ कफ सिरप बनवणाऱ्या श्रीसंत फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील एसआयटीने त्यांना चेन्नईमध्ये पहाटे अटक केली. रंगनाथन गोविंदन यांच्यावर पोलिसांनी 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. छिंदवाडाचे पोलीस अधीक्षक अजय पांडे यांनी या अटकेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे औषध क्षेत्रातील गंभीर अनियमितता समोर आली आहे. केवळ कोल्ड्रीफच नाही, तर रेस्पि फ्रेश टीआर आणि री लाईफ या आणखी दोन औषधांमध्येही विषारी घटक आढळले आहेत. ही दोन्ही औषधे गुजरात स्थित कंपन्यांची असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कार्यवाही करत सर्व औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा घटनांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. या प्रकारामुळे औषध कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Oct 09, 2025 06:09 PM