Kunal Kamra : कुणाल कामराची हिंमत वाढली, RSS नावाच्या ‘त्या’ टी-शर्टमुळे शिंदेंगटाचा संताप, नेमकं प्रकरण काय?
कुणाल कामराने आक्षेपार्ह टी-शर्ट घालून आर.एस.एस.वर टीका केल्याचे ट्वीट समोर आले आहे. यावर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने आक्षेपार्ह टी-शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आर.एस.एस.) टीका केल्याचे एक ट्वीट समोर आले आहे. यापुर्वी कॉमेडियन कुणाल कामरा याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, आज कॉमेडियन कुणाल कामरा याने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे की, हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही. तर कामराने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या टीशर्टवर एक कुत्रा आणि RSS चा उल्लेख दिसतोय. यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते बावनकुळे यांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील, असा इशारा दिला आहे. तर यापूर्वीही कामराने मोदी आणि शिंदे यांच्यावर जहरीली टीका केल्याचे सांगत, आता त्याने संघावर टीका करण्याची हिंमत केल्याबद्दल भाजपने याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.
