Yavatmal | शेतकरी प्रश्नावर पालकमंत्री कुठेही दिसत नाही, पालकमंत्री हरवले का? शेतकऱ्यांचा सवाल

Yavatmal | शेतकरी प्रश्नावर पालकमंत्री कुठेही दिसत नाही, पालकमंत्री हरवले का? शेतकऱ्यांचा सवाल

| Edited By: | Updated on: Aug 27, 2021 | 1:00 PM

आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले आहेत, मदतीसाठी आम्ही कुणाकडे जायचं?, असा सवाल करत यवतमाळच्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा टीव्ही 9 मराठीला सांगितल्या.

आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हरविले आहेत, मदतीसाठी आम्ही कुणाकडे जायचं?, असा सवाल करत यवतमाळच्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा टीव्ही 9 मराठीला सांगितल्या. नव्याने नियुक्त केलेले पालकमंत्री संदीपान भुमरे जिल्ह्यात अपवादाने येतात, त्यांचं कुठं संपर्क कार्यालय नाही, मग आम्ही मदत मागण्यासाठी कुठं जायचं?, असा सवाल शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी केलाय.

हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून द्या

भुमरे यांचं यवतमाळमध्ये संपर्क कार्यालय नाही. शेतकऱ्यांनी समस्यांचे निवेदन द्यायचे कुणाला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हरवलेल्या पालकमंत्र्यांना शोधून दिल्यास शेतकरी संबंधितांचं स्वागत करतील, असं उपरोधाने शेतकरी नेते मनीष जाधव म्हणाले.