tv9 Marathi Special Report | चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर

tv9 Marathi Special Report | चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर

| Updated on: Feb 21, 2026 | 12:01 PM

भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा राजकीय धक्का दिला. भाजपच्या बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना पाठिंबा देत काँग्रेसने त्यांना महापौरपदी विराजमान केले. तसेच काँग्रेसचे तारिक मोमिद यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत भाजपची आणखी सहा मते फुटल्याचे समोर आले.

भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा राजकीय धक्का दिला. भाजपच्या बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना पाठिंबा देत काँग्रेसने त्यांना महापौरपदी विराजमान केले. तसेच काँग्रेसचे तारिक मोमिद यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत भाजपची आणखी सहा मते फुटल्याचे समोर आले. शिवाय शिंदे गटाच्या शिवसेनेनेही भिवंडीत भाजपला साथ दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अखेर काँग्रेसने भिवंडीत भाजपला राजकीय धक्का देण्यात यश मिळवले. दरम्यान, पक्षाच्या व्हीपविरोधात मतदान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर पलटवार करत म्हणाले, “ईडी किंवा पैशांचा वापर करून नगरसेवक फोडले नाहीत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा भाजपने घेतला होता. त्याचाच बदला आता काँग्रेसने भिवंडीत घेतला आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Feb 21, 2026 12:01 PM