काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक कोण लढणार? पहिली यादी जाहीर, ‘या’ 7 जणांना उमेदवारी

| Updated on: Mar 21, 2024 | 10:52 PM

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Follow us on

मुंबई, २१ मार्च २०२४ : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोलापूर – प्रणिती शिंदे, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती, पुणे – रवींद्र धंगेकर, नंदुरबार – गोवाल पाडवी, अमरावती – वळवंत वानखेडे, लातूर – डॉ. शिवाजी कलगे आणि नांदेड – वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.