Rahul Gandhi : हम छोड़ेंगे नहीं… अ‍ॅटम बॉम्ब फुटणार अन् देशात निवडणूक आयोग नष्ट? राहुल गांधींचा EC वर गंभीर आरोप

Rahul Gandhi : हम छोड़ेंगे नहीं… अ‍ॅटम बॉम्ब फुटणार अन् देशात निवडणूक आयोग नष्ट? राहुल गांधींचा EC वर गंभीर आरोप

| Updated on: Aug 01, 2025 | 2:02 PM

राहुल गांधी यांनी याआधीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतांमध्ये झालेल्या हेराफेरीचा मुद्दा उपस्थित केला होता. राहुल गांधी म्हणाले होते की महाराष्ट्र निवडणुकीत आमची फसवणूक झाली. आम्ही निवडणूक आयोगाला मतदार यादी दाखवण्यास सांगितले, पण आम्हाला मतदार यादी दाखवण्यात आली नाही. आम्ही व्हिडिओग्राफी दाखविण्यास सांगितले, पण तेही दाखवण्यात आले नाही आणि कायदा बदलण्यात आला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एसआयआरच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेरले आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आयोग मते चोरी करत असल्याचे म्हटलेय. इतकंच नाहीतर राहुल गांधींनी असाही दावा केला की त्यांच्याकडे याबद्दल ठोस पुरावे आहेत. संसद भवनात माध्यमांशी बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले, आता संपूर्ण देशाला कळेल की निवडणूक आयोग मते चोरत आहे आणि ते हे भाजपसाठी करत आहे. मी हे अत्यंत गांभीर्याने सांगत आहे की निवडणूक आयोगात बसून जो कोणी हे काम करत आहे तो देशाविरुद्ध काम करत आहे. वरपासून खालपर्यंत, कोणीही असो, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत असल्याने आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. हा देशद्रोह आहे, तुम्ही कुठेही असाल, निवृत्त असो किंवा काहीही असो, आम्ही तुम्हाला शोधून काढू.. असं म्हणत राहुल गांधींनी चॅलेंजच दिलं आहे.

 

Published on: Aug 01, 2025 01:57 PM