Sanjay Gaikwad | मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
कांदिवली येथील बालभारती कॉलेजच्या नावाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बालभारती कॉलेजमध्ये दर्शनी भागावरच कॉलेजचे नाव गुजराती भाषेत दर्शवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
कांदिवली येथील बालभारती कॉलेजच्या नावाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बालभारती कॉलेजमध्ये दर्शनी भागावरच कॉलेजचे नाव गुजराती भाषेत दर्शवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, मुंबई विद्यापीठ यांच्या आदेशानुसार महाविद्यालयांचे नाव मराठी भाषेत असणे बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. विद्यापीठाचा स्पष्ट आदेश असतानाही कॉलेजचे नाव गुजराती भाषेतच दिसत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद उसळून येण्याची चिन्ह दिसत आहेत.
यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. “मराठी नाव काढून गुजराती नाव देणे चुकीचे आहे. हे मराठी भाषेवर अतिक्रमण आहे. सरकारने अशा गोष्टी होऊ दिल्या पाहिजेत नाहीत. गुजराती स्वतःसारखे राहू द्या, मराठी स्वतःसारखे राहू द्या,” असं संजय गायकवाड म्हणाले. या प्रकरणात सध्याच्या परिस्थितीत सरकारची भूमिका काय राहणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
