Ajit Pawar NCP : दादांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट, उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर सवाल
पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. आयुष कोंकर हत्या प्रकरणातील लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी मिळाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंडू आंदेकर टोळीतील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघी आयुष कोंकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत, तसेच त्यांच्यावर बेकायदा फ्लेक्स लावणं, अतिक्रमण करणं आणि खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत.
Published on: Dec 30, 2025 06:12 PM
