Nilesh Ghaywal : गृहराज्यमंत्र्यांच्या एका सहीनं गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना! योगेश कदमांच्या भूमिकेवरून गदारोळ

Nilesh Ghaywal : गृहराज्यमंत्र्यांच्या एका सहीनं गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना! योगेश कदमांच्या भूमिकेवरून गदारोळ

| Updated on: Oct 09, 2025 | 12:21 PM

गृहराज्यमंत्री योगेश कदमांमुळे गुंड निलेश घायवळच्या भावाला, सचिन घायवळला शस्त्र परवाना मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांनी सचिनवर गुन्हेगारी नोंदी असल्याने परवान्याला विरोध केला होता. कदमांनी शिफारस केल्याने परवाना रद्द करण्याचे पोलिसांचे आदेश रद्द झाले. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांनी सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्या शस्त्र परवान्याला विरोध केला होता, तसेच परवाना नाकारला होता. मात्र, योगेश कदमांनी पोलिसांचा हा आदेश रद्द करून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे की, शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे अपील केले होते. पोलीस अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशी त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते आणि न्यायालयीन निर्णयाने ते निर्दोष मुक्त झाले होते. त्यामुळे नियमानुसार कार्यवाही करण्यात आली, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय शिरसाट यांनी मात्र, शस्त्र परवाना प्रक्रियेत मंत्र्यांचा हस्तक्षेप नसतो असे म्हटले आहे.

Published on: Oct 09, 2025 12:20 PM