Karnatakमध्ये Hijab घालण्यावरून पेटला वाद

| Updated on: Feb 08, 2022 | 3:34 PM

भगवे शेले (saffron scarves) घेऊन असलेले काही विद्यार्थी या बुरखा (hijab) घातलेल्या विद्यार्थीनीसमोर जोरदार घोषणाबाजी करतात. जय श्री रामची नारे लगावले जातात. एकटी विद्यार्थींनी बुरखा घालून या आक्रमक झालेल्या मुलांच्या विरोधाला न जुमानता कॉलेजच्या दिशेने जाते.

Follow us on

कर्नाटकातील व्हिडिओ मंगळवारी (8 फेब्रुवारी, 2022) समोर आला आहे. एक मुलगी आपली दुचाकी कॉलेजच्या आवारात पार्क करते. यानंतर ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी इमारतीच्या दिशेनं चालू लागते. दरम्यान, या विद्यार्थीनीला घेराव घालण्याचा प्रयत्न होतो. भगवे शेले (saffron scarves) घेऊन असलेले काही विद्यार्थी या बुरखा (hijab) घातलेल्या विद्यार्थीनीसमोर जोरदार घोषणाबाजी करतात. जय श्री रामची नारे लगावले जातात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा (Karnataka Collage Students) आवेश प्रचंड असतो. विद्यार्थीही आपल्या भाषेत या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. अल्ला हू अकबर असं म्हणत ही विद्यार्थीनीही तिला छेडणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. एकटी विद्यार्थींनी बुरखा घालून या आक्रमक झालेल्या मुलांच्या विरोधाला न जुमानता कॉलेजच्या दिशेने जाते. कॉलेजमधीलच काही जणही या विद्यार्थीनीली सुरक्षित आत घेऊन जाण्यासाठी तिच्या आजूबाजूला दिसून आले आहे. मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या जय श्री रामच्या घोषणा कुठेही थांबलेल्या नाहीत.