Video : राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक होणार? टास्क फोर्सच्या बैठकीकडे लक्ष
राज्यात कोरोनाची आकडेवारी (Coorona) पुन्हा वाढत आहे. कोरोनचे रुग्ण वाढल्यास राज्यात मास्क सक्ती (Mask) होऊ शकते, असं सूचक विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार होणार आहे. कोरोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. […]
राज्यात कोरोनाची आकडेवारी (Coorona) पुन्हा वाढत आहे. कोरोनचे रुग्ण वाढल्यास राज्यात मास्क सक्ती (Mask) होऊ शकते, असं सूचक विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार होणार आहे. कोरोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच्या निर्णयाकडे आपले लक्ष असणार आहे.
Published on: Jun 02, 2022 05:00 PM
