Covishield Vaccine | कोरोनावर कोव्हिशिल्ड लस 93 टक्के प्रभावी, केंद्र सरकारची माहिती

| Updated on: Jul 28, 2021 | 8:50 AM

कोरोनावर कोव्हिशिल्ड लस 93 टक्के प्रभावी, केंद्र सरकारची माहिती. या लसीमुळे मृत्यूदर 98 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकारने सशस्त्र सैन्यदलाच्या सर्वेक्षणाचा दाखला दिला आहे.

Follow us on

कोरोनावर कोव्हिशिल्ड लस 93 टक्के प्रभावी, केंद्र सरकारची माहिती. या लसीमुळे मृत्यूदर 98 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकारने सशस्त्र सैन्यदलाच्या सर्वेक्षणाचा दाखला दिला आहे.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. बुधवारच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी घट झाली. कोरोना ओसरत असल्याचं आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 29 हजार 689 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तब्बल 132 दिवसांनी म्हणजेच जवळपास चार महिन्यांनी नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या खाली गेला आहे. त्यासोबतच अॅक्टिव्ह केसेसही चार लाखांच्या खाली आल्या आहेत. कालच्या दिवसात 415 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.