Sandeep Patil | परिस्थिती शांत होत नाही तोपर्यत अमरावतीत कर्फ्यू : संदीप पाटील

Sandeep Patil | परिस्थिती शांत होत नाही तोपर्यत अमरावतीत कर्फ्यू : संदीप पाटील

| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 5:21 PM

अमरावतीतील परिस्थिती काल संध्याकाळी नियंत्रणात आलेली वाटत असतानाच आज पुन्हा अमरावती पेटले. आज भाजपने बंद पुकारलेला असताना हा बंद शांततेत पार पडेल असं वाटत असतानाच अचानक राजकमल चौकात एक मोठा जमाव आला आणि त्यांनी प्रचंड धुडगूस घातला.

अमरावतीतील परिस्थिती काल संध्याकाळी नियंत्रणात आलेली वाटत असतानाच आज पुन्हा अमरावती पेटले. आज भाजपने बंद पुकारलेला असताना हा बंद शांततेत पार पडेल असं वाटत असतानाच अचानक राजकमल चौकात एक मोठा जमाव आला आणि त्यांनी प्रचंड धुडगूस घातला. हा जमाव मिळेल त्या दुकानांवर दगडफेक करत होता. हातात काठ्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करत तोंडाला रुमाल बांधलेला हा जमाव रस्त्यावरून धुडगूस घालत होता. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. पोलिसांनाही जमावाला नियंत्रित करणं कठिण जात होतं. हा जमाव किती आक्रमक आणि अनियंत्रित झाला होता व्हिडीओंमधून दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे, असं प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितलं.