DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार भरभक्कम वाढणार, कधीपासून होणार लागू?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार भरभक्कम वाढणार, कधीपासून होणार लागू?

| Updated on: Aug 11, 2025 | 3:22 PM

केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू झाली आहे. या वाढीमुळे महागाई भत्ता ५३% वरून ५५% झाला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झाली आहे.

केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एक गुडन्यूज आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे सध्याचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के झाला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून निवृत्ती वेतनधारकांनाही याचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास सध्याचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

दरम्यान, वाढती महागाई लक्षात घेता सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो. पहिला १ जानेवारीपासून लागू होतो तर दुसरा १ जुलैपासून लागू होतो. मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता १ जानेवारीपासून लागू मानला जातो. तर आता जाहीर होणारा भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शनधारकांना डीआर देण्यात येतो.

Published on: Aug 11, 2025 03:10 PM