Dadar Kabutarkhana : कबुतरामुळे किडनीचे आजार दूर! अन् …हा तर महादेवावर हल्ला, जैन धर्मगुरूंच्या दाव्याने खळबळ!
कबुतर बचाव धर्मसभेत कैवल्यरत्न महाराजांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सुरेश महाराज यांनी कबुतरांमुळे जीव जातात असे म्हणणे म्हणजे भगवान महादेवावर हल्ला असल्याचे म्हटले. तर रेवतश्री महाराजांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे किडनीचा आजार बरा होतो असा दावा केला आहे.
मुंबईतील दादर येथे कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर “कबुतर बचाव धर्मसभेत” काही धर्मगुरू आणि महाराजांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कैवल्यरत्न महाराजांनी सध्याच्या राजकारणावर टीका केली आहे. सुरेश महाराज यांच्या म्हणण्यानुसार, कबुतरांमुळे जीव जातात असे म्हणणे म्हणजे भगवान महादेवावर हल्ला करण्यासारखे आहे.
तर रेवतश्री महाराजांनी दावा केला आहे की, कबुतरांच्या विष्ठेमुळे किडनीचा आजार बरा होतो. त्यांनी एका विशिष्ट उपायाची माहिती दिली, ज्यात एक महिनाभर कबुतराची विष्ठा पाण्यात भिजवून पिण्याचा सल्ला दिला आहे. कबुतर हे भगवान भगवतींनी अमरनाथमध्ये कथा सांगितलेला पक्षी असून, त्यांच्या मुळे जीव जाणं असं म्हणणं किंवा त्यावर हल्ला करणे म्हणजे हे महादेवावर हल्ला करण्यासारखे असल्याचेही या महाराजांनी सांगितले.
Published on: Oct 11, 2025 05:57 PM
